H M B S S

News

फेटरी नागपूर येथील श्री कोचिंग क्लासेस मधील गुणवंत विध्यार्थांचा हिराबाई मेघे बहू उद्धेशीय शिक्षण संस्था मार्फत सत्कार व पारीतोषीत वितरणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.

2025-06-08

हिराबाई मेघे बहु उद्धेशीय शिक्षण संस्थे तर्फे १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थांच्या सत्कार व प्रोत्साहनपर पारितोषीत वितरणाचा कार्यक्रम दि. ०८/०६/२०२५ रोज रविवार ला फेटरी ग्रामपंचायत मधील समाजभवन मध्ये आयोजीत करण्यात आला.

2025-06-08

हिराबाई मेघे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेतर्फे सहल

हिराबाई मेघे बहुउद्देशीय संस्थेतर्फे श्री कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांची सहल ड्रीम एशिया थीम पार्क येथे नुकतीच काढण्यात आली. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक अनुभव, विविध ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक ठिकाणांची माहिती व्हावी, या उद्देशाने सहलीचे आयोजन करण्यात आले. येथे सांस्कृतिक वारशासोबतच भौगोलिक वैशिष्ट्ये, तसेच शारीरिक व्यायाम व योगासंबंधी माहिती देण्यात आली. हा उपक्रम संस्थेचे सचिव नीरज मेघे यांनी राबविल.

2025-11-30

फेटरी येथे मोफत दंत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

हिराबाई मेघे बहु उद्धेशीय शिक्षण संस्था तसेच अॅडवान्स डेंटल हॉस्पिटल यांच्या वतीने फेटरी येथे २८/०६/२०२६ रोजी फेटरी, माहुरझरी, चिचोली व इतर गाव येथील नागरीकांसाठी मोफत दंत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये तज्ञ दंत चिकित्सकांनी नागरिकांची दात व तोंडाची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. दात किडणे, हिरड्यांचे आजार, तोंडातील स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. ग्रामीण भागातील एकूण 80 नागरिकांनी उत्स्फृत प्रतिसाद दिला. नियमित दंत तपासणी व योग्य तोंडाची स्वच्छता राखल्यास अनेक दंत विकार टाळता येतात असे डॉ. हरीश राठी – संस्थापक अॅडवान्स डेंटल हॉस्पिटल यांनी या वेळी सांगितले. या मोफत दंत आरोग्य तपासणी शिबिराला श्री. बालाजी गुटे – सचिव फेटरी ग्रामपंचायत, प्रमोद राऊत- सरपंच माहूरझरी, गुणवंता घोरमाडे – सरपंच चिचोली तसेच हिराबाई मेघे बहु उद्धेशीय शिक्षण संस्थाचे कु. रजनी मुसळे – अध्यक्ष, श्री. निरज प्रमोद मेघे- सचिव, श्री. वीरेंद्र सिरसकर – कोषाध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.

2026-06-28

Join Us in Making a Differences

Support our mission to empower rural communities through education, skill development, and sustainable initiatives. Together, we can create positive change.