हिराबाई मेघे बहु उद्धेशीय शिक्षण संस्थे तर्फे १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थांच्या सत्कार व प्रोत्साहनपर पारितोषीत वितरणाचा कार्यक्रम दि. ०८/०६/२०२५ रोज रविवार ला फेटरी ग्रामपंचायत मधील समाजभवन मध्ये आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून श्री. सत्यजीत देशमुख (IT Consultant) प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना १० वी १२ वी चे गुण तुम्हचे भविष्य ठरवू शकत नाही. समोरच्या शिक्षणात उत्कृष्ठ कामगीरी तुम्हाला यशाचे शिखर गाठवू शकते असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर श्री. बालाजी गुट्टे (सचिव फेटरी ग्रामपंचायत), श्री. गुणवंत घोडमारे (सरपंच चिचोली/ बोढाळा गट ग्रामपंचायत), श्री. अनिल काळमेघ (सरपंच येरला/गोन्ही गट ग्रामपंचायत), श्रीमती शोभाताई बानाईत (मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले विध्यालय फेटरी), कु. मृणाली दोडेवार (उप सरपंच फेटरी ग्रामपंचायत), जितेंद्र पवार (सदस्य फेटरी ग्रामपंचायत), हर्षा लंगडे (सदस्य फेटरी ग्रामपंचायत) फेटरी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला फेटरी, चिचोली, येरला, माहूरझरी, खंडाळा, बोरगाव या गावातील ४४ विध्यार्थांचा सत्कार पारितोषित देवून करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव श्री. निरज मेघे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धिरज मेघे, सचिन मेघे, मुक्ता देशमुख, निखिता मेघे, पल्लवी टोने, प्रसाद मेघे, श्रेयश नारनवरे यांनी प्रयत्न केले.